ग्रामौन्नती प्रतिष्ठाण, शेतकरी कष्टकरी महासंघ व विवेकानंद सेवा ट्रस्ट व्दारे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संविधान पुस्तिका देऊन कन्हान पत्रकारांचा सत्कार
कन्हान : - ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघ आणि विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांचे निवास स्थान विवेकानंद नगर कन्हान येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
रविवार (दि.२६) जानेवारी २०२५ ला सकाळी ९.३० वाजता ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघ आणि विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत भारत मातेच्या प्रतिमेचे लताताई वंजारी यांचे हस्ते , महात्मा गांधीच्या प्रतिमेचे देशमुख गुरूजी यांचे हस्ते , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे कुमार नायर यांच्या हस्ते आणि राष्ट्रध्वजाचे सेवानिवृत्त पोलीस राजाराम बढे यांचे हस्ते पुजन करून नँचरोपँथी डॉ विजेता यांचे हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली .
सर्व मान्यवरांनी स्थान ग्रहन केल्यावर सेवानिवृत्त भारतीय सैनिकांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी कमलेश पांजरे , नगरसेविका राखी परते , सेवानिवृत्त सैनिक गडपायले आदी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद करून गुणगौरव करित उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांनी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे , सचिव सुनिल सरोदे , कार्याध्यक्ष कमल सिंह यादव , निलेश गाढवे , आकाश पंडितकर , केतन भिवगडे , पत्रकार किशोर वासाडे , प्रकाश तिवारी सह मान्यवर आदिंना आपल्या परिसरात संविधाना चे वाचन करून संविधान जागृती करून नागरिकांना कमीतकमी मुलभुत अधिकारांच्या जागृतीपर संविधान पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला .
देशाला स्वातंत्र करण्याकरिता हजारो स्वातंत्र सैनिक , देशभक्तानी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश स्वातंत्र केला . आपण देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा साजरा करित लोकशाही देशात नांदत आहे . तरी सु़ध्दा भारतीय नागरिकांचा पाहिजे त्याप्रमाणे विकास साधता आला नाही . सुरूवातीला पाहिजे तशी साधन सामुग्री नसतांना सत्तेचे विकेंद्रीकरण करून तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांचा मुलभुत विकास साधण्याचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करण्यात आला . परंतु आता सत्तेचे केंद्रीयकरण होत गरिब गरिबच होत , मोजके विशिष्ट मंडळी श्रीमंत होत असमानता , शहराच्या तुलनेत ग्रामिण गाव खेडयात विकासात दुजाभाव दिसत आहे . यामुळे बेरोजगारी, महागाईने नागरिक , युवा , शेतकरी , नागरिक व महिला त्रस्त असल्याने मुलभुत न्याय हक्काकरिता सर्वानी एकत्र येत अन्याया विरूध्द पेटुन उठुन लढा देऊ तरच आपली येणारी पिढी सुरक्षित करू शकु असे अध्यक्षिय मार्गदर्शनात मा. प्रकाश भा़ऊ जाधव हयांनी संबोधित केले . उपस्थित सर्वांना अल्पोहार व चाय वितरण करून सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र चकोले यांनी तर ग्रामोन्नती प्रतिष्ठाण सचिव मोतीराम रहाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
या प्रसंगी सेवानिवृत्त सैनिक जयवंत गटपाडे , राजु सहारे , शेख मोहम्मद , इसराईल शेख , अरविंद अंबासकर , नगरसेविका गुंफाताई तिडके , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , शांताराम जळते , पटले सर , एकनाथ खर्चे , रूमदेव मानकर , किशोरी अरोरा , ताराचंद निंबाळकर , विठ्ठल मानकर , बालाजी नायर , माटे काकाजी , अशोक मेश्राम , प्रमोद वानखेडे , कन्हान हाकस युनियनचे प्रशांत पाटिल , चिराल वैध , दिगंबर हारगुडे , प्रकाश सिंह परमसिंह , सचिन चकोले , अमोल रामटेके , शेख हबीब , नुसरत परवेज , किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, महेश धोगडे , बंटी हेटे , सौरभ वाघमारे , राहुल रामटेके , अमोल मोहबे , सरोज बुंदेलिया , इंदिरा वालदे , अनिता वाघमारे , वनिता बुंदेलिया , अनिल हटीले , सूनिल हटीले , सुनिल खरवार , सुभाषचंद्र अहिरवार , पंजाब वानखेड़े , राहुल वानखेड़े , संजय रंजेश , संदीप बुंदेलिया सह सेवानिवृत्त सैनिक , शिक्षक , कर्मचारी , जेष्ठ नागरिक , व्यापारी , आशा वर्क्स , आगणवाडी सेविका , सामाजिक , राजकिय पदाधिकारी , कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दिलीप राईकवार , कोठीराम चकोले , सचिन साळवी , प्रविण गोडे , विजय डोणेकर , गोविंद जुनघरे , जिवन ठवकर , रूपेश सातपुते , राजु गणोरकर , प्रतिक जाधव , योग राज अवसरे , हबीब शेख , सोनु कुरडकर , यशवंत खंगारे , प्रशांत येलकर , मनोज गुडघे , पुरुषोतम येणेकर , प्रकाश तिमांडे , शितल भिमणवार , आशिष वडस्कर , निशांत जाधव , श्याम मस्के , संतोष गिरी , राहुल ऊके , राजकुमार बावने , आयुष भोगे , क्रिष्णा केझरकर , चेतन ठवरे सह अनेक कार्यकर्ते व सदस्यांनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time